के. बी.एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,( दुपार सत्र )मालेगाव कॅम्प येथे आज दिनांक 01/08/2024 वार गुरुवार रोजी मा. आ. डॉ. अपूर्वभाऊ हिरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री प्रफुल्ल निकम होते.पर्यवेक्षक श्री. संजय चव्हाण कार्यक्रमास व्यासपीठावर उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते विद्येची देवता माता सरस्वती,कर्मवीर भाऊसाहेब हिरे,लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्रीे योगेंद्रसिंग ठोके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विद्यालयात मा.आ.डॉ. अपूर्वभाऊ हिरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अपूर्व दत्तक योजनेमार्फत विद्यालयात गरीब विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.
0 Comments