श्रीरामांच्या अयोधेच्या मंदिराच्या प्रतिकृतीची मालेगावात सवाद्य भव्य शोभायात्रा....

*धुळ्याचे हर्षवर्धन दहिते ( पाटील ) यांच्या तर्फे संपूर्ण धुळे लोकसभा मतदार संघात शोभायात्रेचे भव्य आयोजन...*

श्री कन्हैयालाल महाराज ट्रस्ट, साक्री जि. धुळे संचलित..... श्री. हर्षवर्धन शिवाजीराव दहिते (पाटील) यांच्या मार्गदर्शनाने अयोध्या येथील श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या प्रतिकृतीचे पावन दर्शन व शोभायात्रे चे आयोजन  बालाजी मंदिर, मारवाडी गल्ली, कॅम्प, मालेगाव येथून करण्यात आले.. या वेळी टाळ मृदुंग ग सहित मिरवणूक काढण्यात आली ज्ञानोबा माऊली तुकाराम यांचा गजर करीत मिरवणुकीत सर्वांनी ठेका धरला यावेळेस श्रीरामाच्या रथावर जेसीपी ने पुष्पवृष्टी करण्यात आली

 रामसेतू पुल राम मंदिर येथे शोभा यात्रेचा समारोप करण्यात आला... या शोभायात्रेत मोठ्या संख्येने नागरिक, उपस्थित होते...