साक्री (ता.२३) कलियुगात ५०० पाचशे वर्षाच्या  कालखंडानंतर प्रत्येक क्षण श्री राम जन्मभूमी बाबतीत सत्यात उतरले  22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम पुन्हा एकदा बाल रूपात अवतरले आणि ही भारतभूमी पुन्हा एकदा राममय झाली .याचे औचित्य साधून साक्री शहरात नगरसेविका अँड पुनम जगदीश शिंदे (काकुस्ते ) यांच्याहस्ते साक्री शहरातील अंबापुर रोड येथील रामदेवजी बाबा आदिवासी वस्तीत सर्व गोरगरीब माता भगिनी यांच्यासोबत शबरी मातेच्या आठवणींना उजाळा देत सर्व उपस्थित आदिवासी माता-भगिनींना हळदीकुंकू आणि भेटवस्तू प्रदान करून आगळावेगळा असा प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला.
 याप्रसंगी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ धुळे कर्मचारी संघटनेचे महिला आघाडीच्या  जिल्हाध्यक्ष करुणा पाटील तसेच मंगल संजय महाले ,राधिका साहेबराव गावित, नीलम शेखर महाले, केवळबाई पितांबर वाघ, लीलाबाई रामभाऊ भदाणे, कविता अरविंद ठाकरे ,गुड्डी सतीश ठाकरे, सुनंदा दौलत मोरे, उषाबाई बटू वाघ, गोकुळ देविदास ठाकरे ,अक्का सुरेश सोनवणे, रुक्‍माबाई देवबा पगारे, सोनल दीपक पगारे, रवीत कृष्णा माळीच आदि महिला उपस्थित होत्या.
श्रीरामाच्या कथांची उजळणी जेव्हा जेव्हा होते त्यावेळी माता शबरीच्या मात्रू प्रेमाची ऊजळणी झाल्याशिवाय रामकथा पूर्ण होत नाही, आणि आज जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंद होईल अशा सोहळ्याचे साक्षीदार सर्व जग होत असताना आदिवासी समाजातील माता शबरीचे वंशज म्हणवणाऱ्या आदिवासी माता-भगिनींना हळदी कुंकू करविण्यासोबत श्री राम प्रतिष्ठापना करण्यात सहभागी होत असल्याचे समाधान अँड्. सौ.पूनम शिंदे-काकुस्ते यांनी सांगितले. तसेच सर्व आदिवासी भगिनींनी 'आपुला राम आज ऊना...' म्हणत एकमेकांना हळदीकुंकू करून भेटवस्तू देऊन श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा आगळावेगळा असा सोहळा साजरा केला.
फोटो.. आदिवासी भगिनींना भेटवस्तू आणि हळदीकुंकू देत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करताना नगरसेविका अँड. पूनम शिंदे-काकुस्ते.