नाशिक : जनकल्याण मराठी पत्रकार संघाची राज्य कार्यकारिणी ची बैठक आज निफाड येथिल होटेल गुलमोहर येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार अन्वर पठाण व बाळासाहेब अस्वले हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सैयद हे होते. या वेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचलित पोलीस मित्र समितीच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदि दिनेश पगारे यांची निवड करण्यात आली.यावेळी राज्याध्यक्ष देविदास बैरागी, पोलीस मित्र समितीचे राज्याध्यक्ष आनंद दाणी, अन्याय अत्याचार निवारण समितीच्या राज्याध्यक्षा कल्याणी धोंडगे, आदिसह जिल्हा व तालुक्याचे अनेक नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते.