सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे मालेगांव शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांना आत्मदहनाचा इशारा निवेदन देऊन देण्यात आला आहे.
या निवेदनात १) बेकायदेशीर कत्तलीचे रक्तमिश्रीत तसेच केमिकल युक्त पाणी मोसम नदी पात्रात सर्रासपणे वाहते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते ते थांबविण्यात यावे, २) इस्लामाबादकडे जाणारी पाईप लाईन जागोजागी लिकेज असून ती बदलण्यात यावी, ३) गुळ बाजारातील रोडचे काँक्रीटीकरण करण्यात यावे, ४) मालेगांव शहरात पार्किंग व्यवस्था २४ वर्षे उलटूनही अद्यापपावेतो झालेली नाही. शहरात ठीक ठिकाणी पार्किंग झोनची निर्मिती करण्यात यावी, ५) शहरातील नागरिकांवर जिजियाकराप्रमाने दरवर्षी होणारी ५% पाणीपट्टी वाढ रद्द करण्यात यावी, ६) मोकाट भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, ७) सांडवा पुल वाहतुकीसाठी खुला करणे व शहरातील वाहतुक समस्या सोडवण्यासाठी नियोजन करावे अशा विविध मागण्या करण्यात आल्यात आहेत .
मालेगाव शहरातील विविध समस्यांसाठी सोडविण्यासाठी गेल्या वर्षभरापासून सार्वजनिक नागरी सुविधा समिती व इतर सामाजिक संघटना वारंवार आंदोलन करत आहेत. त्यावेळी मनपा प्रशासनातर्फे वारंवार आश्वासन देऊन देखील आश्वासनांची पूर्तता करण्यास प्रशासन चालढकल करत असल्याच्या निषेधार्थ दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी मनपा आयुक्तांच्या दालनात आत्मदहन करण्याचा निर्णय सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे रामदास बोरसे, आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार, आ भा मराठा महासंघाचे भरत पाटील, सामाजिक कार्यकर्ते राम गवळी यांनी मनपा आयुक्त यांचे भेट घेऊन व्यक्त केला आहे.
0 Comments