==== *प्रेसनोट*===
*लाचेचा यशस्वी सापळा कारवाई*
▶️ *युनिट -* नाशिक
▶️ *तक्रारदार-* पुरुष, 54 वर्षे
▶️ *आलोसे*- 1) रवींद्र बळीराम दहीते वय 55 वर्षे, अव्वल कारकून, नेमणूक - धान्य वितरण अधिकारी कार्यालय, मालेगाव रा. 16, जयहिंद कॉलनी, चर्च मागे, मालेगाव कॅम्, मालेगाव जिल्हा नासिक
▶️ *लाचेची मागणी दिनांक* :- 04/04/2024 रोजी
**लाचेची मागणी रक्कम :- 22,500/- रुपये,*
▶️ *लाच स्वीकारली दिनांक*- 08/04/2024 रोजी
**लाच स्वीकारली *-*
22,000/- रुपये
▶️ *लाचेचे कारण* - यातील तक्रारदार हे मालेगाव येथील राहणारे असून त्यांचा लाकूड खरेदी विक्रीचा व्यवसाय असून ते सामाजिक कार्य ही करतात.
तक्रारदार यांनी ते राहत असलेल्या मालेगाव शहर परिसरातील 15 गरीब व गरजू कुटुंबीयांचे अंत्योदय योजना व पिवळे रेशन कार्ड ची रेशन मिळण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी प्रकरणे सादर केली आहेत. तक्रारदार हे दिनांक 4/4/24 रोजी मालेगाव येथील आलोसे रवींद्र दहिते, अव्वल कारकून धान्य वितरण अधिकारी कार्यालय मालेगाव यांच्याकडे त्यासंदर्भात गेले असता त्यांनी प्रत्येक कुटुंबीयांचे 1500/- रुपये याप्रमाणे एकूण 15 कुटुंबीयांच्या रेशन कार्ड नोंदणी ऑनलाईन करण्यासाठी एकूण 22,500/- रुपयाची पांचासमक्ष मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केले व
दिनांक 08/04/2024 रोजी पंचांसमक्ष 22,500/- रुपये पैकी 500 रू तक्रारदार यांना परत करून 22,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे
▶️ **आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी*
मा .जिल्हाधिकारी नाशिक
▶️ *सापळा अधिकारी*
*अनिल बडगुजर, पोलीस उप आधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक*
मो.न. 8999962057
▶️ *सापळा पथक*-
*पोलीस नाईक/ दिपक पवार
*पोलीस शिपाई/ संजय ठाकरे
*सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक* .
▶️ **मार्गदर्शक* -
**मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर*
*पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक*
मो.न. 9371957391
*मा .श्री माधव रेड्डी*
*अपर पोलिस अधिक्षक,
ला.प्र.वि नाशिक परिक्षेत्र नाशिक*
मो नं 9404333049
*सहकार्य - श्री.नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक*
मो.न. 9822627288.
--------------------
*याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.*
दुरध्वनी क्रमांक-
02532578230,
0 Comments