हर्षवर्धन दहितेंकडून चंद्रशेखर बावनकुळेना श्रीराम मंदिर प्रतिकृती भेट, मुंबई येथील भारतीय जनता पार्टी च्या कार्यालयात पदाधिकारी बैठक प्रसंगी धुळे जि. प. चे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती मा. हर्षवर्धन दहिते यांनी भाजपा चे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. त्याप्रसंगी अयोध्या येथील प्रभु श्रीराम मंदिराची प्रतिकृती सप्रेम भेट दिली. यावेळी भाजपा चे महामंत्री विजय चौधरी, भाजयुमो चे विक्रांत पाटील, धुळे मनपा चे नगरसेवक संजय पाटील, महाराष्ट्र प्रदेश भाजपा चे निमंत्रित सदस्य हेमंत मराठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सभापती हर्षवर्धन दहिते यांनी धुळे लोकसभा मतदार क्षेत्रात 2 जानेवारी पासून प्रारंभ केलेल्या प्रभु श्रीराम मंदिराच्या प्रतिकृती चे पावन दर्शन व शोभायात्रा चे अतिशय उत्कृष्ट आयोजन करून सर्व नागरिकांना श्रीराम मंदिर दर्शनाची अनुभूती मिळवून दिल्याबद्दल प्रशंसा करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.