सरस्वती जिंकते की पॉकेट पैठणी यावर जनतेचे बारीक लक्ष आहे

शिक्षक समाजाची नैतिकता पणाला लागली आहे

शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, विविध समस्या सोडवण्यासाठी शिक्षक मतदार संघातून शिक्षकांनी आपला शिक्षक उमेदवार च निवडून द्यायचा असतो.हे सर्व जनतेला समजतं पण या विभागातील मतदारांना समजून देखील उमजत नसल्याचा खेद आहे. 

     शिक्षकांच्या हक्काच्या मतदार संघात शिक्षक सोडून भलतेच शेठ लोकं निवडून दिले जात आहेत.या घुसखोरांना रोखण्याऐवजी यांनाच पुन्हा निवडून आणण्याची काही लोकांची धडपड शिक्षक समाजाला कलंकित करत आहे.अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांना निवडून देऊन शिक्षक समाज त्यांच्या कडून कशी काय न्यायाची अपेक्षा करू शकतो? 

विद्यार्थ्यांना लोकशाही शिकवणारे शिक्षक पॉकेट पैठणीच्या नादात स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत आहेत,हे लक्षात घेतले पाहिजे.शिक्षकांच्या समस्या एक शिक्षकच समजू शकतो आणि पोट तिडकीने सोडवू शकतो.

  गेल्या २ पंचवार्षिक निवडणूकीत शिक्षकांनी आर्थिक निकषावर आपला शिक्षक आमदार निवडून देत शिक्षक संघटना,चळवळ यांचे अतोनात नुकसान केले आहे. निवडून दिलेल्या आमदारांनी विधान परिषदेत शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिखाऊ प्रयत्न केलेत टिकाऊ नाही.  

        यंदाच्या निवडणुकीत तरी सरस्वती चा विजय करून पॉकेट पैठणी संस्कृतीचा पराजय करा.या निवडणुकीत शिक्षक समाजाची नैतिकता पणाला लागली आहे.जनता बारकाईने आपल्यावर नजर ठेवून आहे. 


 शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून आर डी निकम सर हे एकमेव सक्षम पर्याय उपलब्ध झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिक्षकांच्या प्रश्नांवर काम करीत आहेत.तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी म्हणून महाराष्ट्रासह दिल्ली पर्यंत त्यांनी लढा दिला आहे.शिक्षक चळवळ व शिक्षक मतदार संघ वाचवण्यासाठी आर डी निकम यांना प्रथम पसंतीचे मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करावे.



निखिल बाळासाहेब पवार
आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती 
वांजुळपाणी संघर्ष समिती (नार पार गिरणा लिंक)