दि. 1ऑगस्ट 2024 रोजी हरणबारी, मुल्हेर येथे भेट देऊन माननीय पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते व्रुक्षारोपण करण्यात आले . मोसमखोरे जलसंवर्धन समितीच्या वतीने कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते . यावेळी १५ हजार विविध प्रजातीचे व्रुक्ष हरणबारी, मुल्हेर, अंतापुर, ताहाराबाद, करंजाड गावातील डोंगरावर व्रुक्षारोपण करण्यात आले व आज मुल्हेर येथील कार्यक्रमात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे साहेब, प्रान्त काकडे साहेब , तहसीलदार चावडे साहेब , जलसंपदा विभागाचे उप अभियंता खैरनार साहेब , द्वारकाधीश कारखान्याचे सचिन दादा सावंत , रावळगाव कारखान्याचे चव्हाण साहेब , डॉ. प्रशांत सोनवणे, पंकज भामरे , रोटरी क्लबचे पदाधिकारी, वनविभागाने सहाणे साहेब , बिडिओ गायकवाड मॅडम , पोलिस अधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते . यावेळी अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी मोसम खोरे जलसंवर्धन समितीच्चा कामाचे कौतुक केले व त्यांच्चा कार्याची स्तुती केली व आपणास अजुन काही मदत लागल्यास आम्हाला कळवावे असे त्यांनी सांगितले यावेळी डॉ. प्रसाद सोनवणे यांनी हरणबारी धरणातील गाळ काढण्यासाठी आलेल्या अडचणी व विविध सामाजिक संस्था , ऊद्योजक यांनी केलेली मदत व १५ हजार व्रुक्ष लागवड यांची माहिती दिली व बागलाणचे आमदार श्री दिलीप बोरसे यांनी समितीचे सदस्य विकास बत्तीसे, प्रवीण भामरे, दीपक कांकरिया, अनिकेत सोनवणे, दिनेश सावळा, गजानन साळवे, सतीश भामरे, राजेंद्र कुटे, बापु भोये यांचा सत्कार केला यावेळी असंख्य नागरिक, शेतकरी, व महिला उपस्थित होत्या यावेळी मुल्हेर उद्धव महाराज मंदिर परिसरात पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी वृकक्षारोपण केले.